श्री महाकाल प्रतिष्ठान, बच्चे सावर्डे आयोजित कावड यात्रा २०२५ संपन्न.
श्री महाकाल प्रतिष्ठान, बच्चे सावर्डे आयोजित कावड यात्रा २०२५ संपन्न.
----------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
-----------------------------------
श्री महाकाल प्रतिष्ठान, बच्चे सावर्डे तर्फे कावड यात्रा २०२५ रविवार दि. १७ ऑगस्ट व सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली.
ही कावड यात्रा बच्चे सावर्डे येथील महादेव मंदिर येथून प्रारंभ होऊन श्री क्षेत्र मल्लिकार्जुन, येडेनिपाणी येथे समाप्त झाली. यात्रे मध्ये सुमारे २८ किलोमीटर अंतर पार केले. या यात्रे मध्ये 20 ते 25 तरुणांचा सहभाग होता.
यात्रेदरम्यान मांगले येथे शिवप्रतिष्ठान तर्फे यात्रेचे स्वागत करण्यात आले. ऐतवडे येथे अतुल पाटील (मोरया बाजार, माले) यांचेकडून यात्रेकरूंना जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रेचा समारोप श्री मल्लिकार्जुन मंदिर, येडेनिपाणी येथे करण्यात आला.

No comments: