वारणा नदीच्या पुरामुळे सावर्डे–मांगले बंधारा तिसऱ्यादा पाण्याखाली.

 वारणा नदीच्या पुरामुळे सावर्डे–मांगले बंधारा  तिसऱ्यादा पाण्याखाली.

---------------------------------

बच्चे सावर्डे  प्रतिनिधी 

 सुनिल पाटील 

---------------------------------

सावर्डे परिसरात पावसाने जोर धरले असून वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, सावर्डे–मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.


 गेली चार पाच दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे छोटे-मोठे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे.


नदीकाठची शेती, पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.