नांदणी येथील "माधुरी हत्तीणी"च्या प्रकरणावर बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्य सरकार विरोधात निदर्शने.
नांदणी येथील "माधुरी हत्तीणी"च्या प्रकरणावर बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्य सरकार विरोधात निदर्शने.
---------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
हातकणंगले तहसीलदारांच्या माध्यमातून मे.राष्ट्रपती यांना निवेदन.
PETA संस्थेने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मा. न्यायालयाने दिलेल्या एकतर्फी निर्णयामुळे नांदणी मठामध्ये असणाऱ्या हत्तीणीचे स्थलांतर गुजरात मधील वनतारा येथे करण्यात आले आहे.
वास्तविक पाहता *PETA ने चुकीची माहिती पुरवून न्यायालयातून आदेश मिळवला होता, याचा परिणाम स्थानिक संस्कृती, धार्मिक परंपरा इत्यादी गोष्टींवर होत असेल आणि यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून भावनिक, धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती असून देखील राज्य शासनाने केवळ बघ्याची भूमिका* घेतली होती.
माहितीनुसार राज्यसरकारला PETAच्या 'या' घटनेत हस्तक्षेप करता येत असून देखील त्यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्या या गोष्टीला शांत राहून मूकसंमती दर्शवली आहे.त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकार विरोधात उपनेते संजय पवार, मा. आमदार सत्यजित पाटील (आबा), सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राज्यसंघटक नवेज मुल्ला, राज्यसंघटक चंगेजखान पठाण, सहसंपर्कप्रमुख हाजी असलम सय्यद, सहकारी जिल्हाप्रमुख वैभव उगळे, रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल ताई चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करन्यात आली , यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.
तरी या आंदोलनाकरिता सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तसेच या घडलेल्या चुकीच्या घटनेची ज्यांच्या-ज्यांच्या मनामध्ये चीड आहे अशा सर्व नागरिकांन उपस्थित राहुन आपला निषेध व्यक्त केला.
No comments: