प्रज्ञा कांबळे कुटुंबाला न्याय द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी.
प्रज्ञा कांबळे कुटुंबाला न्याय द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी.
------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------
कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने प्रज्ञा कांबळे भोगावती करवीर कोल्हापूर यांच्या राहत्या घरी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट दिली. भेट दिल्यानंतर कुटुंबाशी चर्चा झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्या चे निवेदन पोलीस अधीक्षक व निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. व निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये पुरवणी जबाब नोंदवून सदर एफ आय आर (FIR )मध्ये फिर्यादी म्हणून मृत मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीला घेण्यात यावे व उपरोक्त सर्व तपशील नमूद असणारा नवीन एफ आय आर नोंद करण्यात यावा. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे एलसीबी (LCB )किंवा पोलीस उच्च अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात यावा जेणेकरून गुण्याचा तपास कामी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईल .कार गाडीत उपस्थित असणाऱ्या व मुख्य गुन्हेगाराला प्रोत्साहन देणाऱ्या इतर तीन ते चार इसमांना सह आरोपी करण्यात यावे संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घालून आवश्यक ते सर्व कलमे ज्यामध्ये कट करून खून केल्याची आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांची वाढ करण्यात यावी. यासह तात्काळ योग्य कारवाईची अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम दयानंद कांबळे सचिव अरुण जमणे ,शहराध्यक्ष अरुण सोनवणे माथाडी कामगार युनियन अध्यक्ष व शहर महासचिव संजय गुदगे, महासचिव महाबोधि पद्माकर शिरूर तालुकाध्यक्ष संदीप कांबळे युवा महासचिव डॉक्टर आकाश कांबळे युवा शहराध्यक्ष अमित नागटीळे,करवीर तालुका नेते नितीन कांबळे ,उपाध्यक्ष सचिन कांबळे ,करवीर महासचिव संतोष पवार, संग्राम कांबळे ,आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment