डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करा – आप्पासो पोवार .

 डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करा – आप्पासो पोवार 

--------------------------------- 

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

9595316266

--------------------------------- 


 कळे : सामाजिक एकोपा व शिस्तीचे प्रतीक असणारा गणेशोत्सव तरुणांनी  डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करावा, असे आवाहन शाहुवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पोवार यांनी केले.


कळे पोलिस ठाणे अंतर्गत आयोजित गणेशोत्सवाच्या नियोजनबद्ध, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.


 “गणेशोत्सवात डॉल्बीचा अतिरेक हा समाजासाठी घातक ठरत आहे.  डॉल्बीला फाटा देऊन रक्तदान शिबिरे,  समाज प्रबोधनपर नाटिका, महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, गरजूंसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही पोवार  यांनी यावेळी केले  ”


   यावेळी कळे पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी  प्रास्ताविकामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना   गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

      यावेळी रवींद्र पाटील ( कळे ) व आनंदा पाटील ( मरळी ) यांनीही मनोगत व्यक्त केले.

 " एक गाव एक गणपती ' ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणाऱ्या  गावांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यामध्ये   गोठे, माजनाळ, साळवाडी,  पडसाळी,  वाळोली,  नवलेवाडी, कुंभारवाडी,  वाळवेकरवाडी,  निवाचीवाडी,  आतकीरवाडी,  मोरेवाडी, पिसात्री,  मुगडेवाडी,  बांद्रेवाडी,   सुंबेवाडी,  जाधववाडी, वाशी,  गोठणे,  बळपवाडी,  मोताईवाडी,  तांदुळवाडी,  सुळे,  मेंगानेवाडी, काळजवडे,  चाफेवाडी व मल्हारपेठ  या २६ गावांचा समावेश आहे.


    यावेळी डॉल्बीमुक्त १५ तरुण मंडळांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


     अंबर्डेचे पोलीस पाटील रामदास पाटील यांनी सूत्रसंचलन केले. कोलिकचे  पोलीस पाटील संजय पाटील यांनी आभार मानले.


    संयोजन कळे पोलीस ठाण्यातील  गोपनीय पोलीस अंमलदार  अंकुश शेलार व कळे  पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांनी केले. 


बैठकीस कार्यक्षेत्रातील  पोलीस पाटील,  गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.