थोर विभूतींच्या कार्य आणि कर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी ॲडव्होकेट गिरीश नानिवडेकर.

 थोर विभूतींच्या कार्य आणि कर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी ॲडव्होकेट गिरीश नानिवडेकर.

------------------------------

 कळे प्रतिनिधी

साईश मोळे

---------------------------

      कळे:- थोर विभूतींच्या कार्य आणि कर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन

पन्हाळा एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश नानिवडेकर यांनी केले. ते कळे (ता. पन्हाळा ) येथील कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज , कळे या प्रशालेत लोकमान्य टिळक व पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.मामासाहेब गुळवणी यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

     यावेळी साहित्यिक प्रा. कृष्णात खोत, प्रा. व्ही. डी. कोळी व एस. आर. भोई यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या कार्याची ओळख करून दिली. 

     

              स्वागत प्राचार्य ए. बी.गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक विभागप्रमुख डी. डी. खवरे यांनी केले. शर्वरी कार्वेकर , प्रणव कुंभार, अक्षता मानकर , संस्कृती कालेकर , अपेक्षा पाटील , या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवानी विभुते व अक्षता सूर्यवंशी या विद्यार्थीनींनी सूत्रसंचलन केले. प्रा. एस. वाय. कदम यांनी आभार मानले.  


       कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

कोल्हापूर विभाग

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.