विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेला साऊंड सिस्टिम प्रदान.
विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेला साऊंड सिस्टिम प्रदान.
------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
------------------------------
विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेत 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेला छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीची साऊंड सिस्टिम प्रदान केली. शाळेतील भौतिक सुविधा पुर्ततेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये शाळेच्या वतीने सर्वांना आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेसाठी साउंड सिस्टिम उपलब्ध करून देणे विषयी आवाहन केले. ग्रामस्थांनी देखील या आवाहनास प्रतिसाद देत जवळजवळ 36 हजार पाचशे रुपये किमतीची साऊंड सिस्टीम स्वातंत्र्य दिना विषयी शाळेला प्रदान केली. तसेच भविष्यात शाळेच्या प्रगतीची घोडदौड अशीच चालू राहिल्यास यापुढे देखील भरघोस अशी मदत करून मोठा शैक्षणिक उठाव उभा केला जाईल अशा प्रकारची सर्वांच्या वतीने ग्वाही देण्यात आली. यावेळी शाळेच्या रंग रंगोटी साठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरीव स्वरूपात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच साऊंड सिस्टीम साठी मदत देणाऱ्या देणगीदारांचा देखील सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य ,सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ,गावातील सर्व पदाधिकारी, सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर एस भाटले सर यांनी केले.सुत्रसंचालन श्री डी एस पाटील सर यांनी केले.नियोजन श्री सुहास पाटील सर ,श्री आनंदा पाटील सर, सौ.नंदा जाधव मॅडम ,कुमारी पूजा पाटील मॅडम यांनी नियोजन केले. शेवटी श्री सदाशिव अस्वले सर यांनी आभार मानले.*
No comments: