पणुंद्रे चिखलगुट्टा मैदानात करंजपेणच्या उत्तम पाटील यांची बैलजोडी प्रथम.
पणुंद्रे चिखलगुट्टा मैदानात करंजपेणच्या उत्तम पाटील यांची बैलजोडी प्रथम.
-------------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
-------------------------------
पणुंद्रे येथे सतीमाता तरुण मंडळ, जाधववाडी व पणुंद्रे ग्रामपंचायत आणि शर्यतीचे आयोजक रविंद्र जाधव यांनी आयोजित केलेल्या चिखल गुठ्ठा शर्यत स्पर्धेत उत्तम पाटील ( करंजपेण )यांच्या बैलजोडी ने प्रथम क्रमांक पटकावला आणि रेडा जोडी मध्ये प्रथम क्रमांक राजाराम पाटील( जाधववाडी )या चिखलगुठ्ठा बैलजोडी रेडा जोडीना रोख रुपये आणि मानाची ढाल बक्षिस देण्यात आले
या चिखलगुट्टा शर्यतीचे उद्घाटन भाजप नेते व शेतकरी जन आक्रोश आंदोलन प्रमुख आबासाहेब पाटील व सुभेदार सुनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी
या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील १५ बैल व १३ रेडा जोडी अशा २८ जोडीने सहभाग घेतला होता पणुंद्रे गावातील भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असणारे जवानाने चिखलगुठ्ठा शर्यतीस देणगी देऊन सहभाग घेतला पहिल्या पाच क्रमांकांना रोख रक्कम व मानाची ढाल देऊन गौरव करण्यात आला या चिखल गुट्ठा शर्यतीचे धावते समालोचन पैलवान दत्ता वारकरी, घडयाळ पंच डॉ सुनिल पाटील यांनी केले
बैलजोडी शर्यतीत द्वितीय क्रमांक राजाराम पाटील ( शिराळे ), तृतीय क्रमांक धोंडिबा पाटील (आरुळ ), चतुर्थ क्रमांक स्वाप्निल शिन्दे ( आंबेवाडी ), पाचवा क्रमांक अमित पाटील( आरूळ ), रेडा जोडी चिखल गुट्टा मध्ये द्वितीय क्रमांक रोहित सावंत ( पाली ), तृतीय क्रमांक सुरेश काटकर (भुदरगड), चौथा क्रमांक विरोबा प्रसन्न ( परळे निनाई ), पाचवा क्रमांक धोंडिबा पाटील ( करंजपेण ) या सर्व बैलजोडी व रेडा जोडी मालकांना रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस देऊन गौरविण्यात आले
या चिखल गुट्ठा शर्यत स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रमास भाजप नेते व शेतकरी जन आक्रोश आंदोलन प्रमुख आबासाहेब पाटील , आयोजिक रविंद्र जाधव ,पैलवान प्रकाश काळे, शिवाजी पवार, सुभेदार सुनिल पाटील, विकास कांबळे, सिंकदर कुरेशी, मनोहर जाधव आदी उपस्थित होते या चिखलगुठ्ठा शर्यत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लखन गुरव, मनोहर जाधव, सुनिल पाटील, राजू लोखंडे, गणेश काळे, सुनिल भोसले, लक्ष्मण काळे, बापू शिंदे, सांगर जांभळे संभाजी खोत, तुकाराम पाटील, संदीप पाटील आदी सहकार्य केले
Comments
Post a Comment