गोकुळ शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई: १ लाख २९ हजार रुपयांच्या चोरीच्या ७ मोटरसायकली जप्त

 गोकुळ शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई: १ लाख २९ हजार रुपयांच्या चोरीच्या ७ मोटरसायकली जप्त

 -------------------------------------

सलीम शेख 

--------------------------------------

गोकुळ शिरगाव  : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव पोलिसांनी मोटरसायकल चोराचा पर्दाफाश करत, एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीच्या ७ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव आणि कागल पोलीस ठाण्यामधील अनेक गुन्हे उघड झाले आहेत.गोकुळ शिरगाव येथील अजित मधुकर काटे यांच्या मालकीची ३५,००० रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक: एम. एच-०९-डी.सी-१७४१चोरीला गेल्याची तक्रार गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार गोकुळ शिरगाव पोलिसांनी गस्त वाढवली.या गस्तीदरम्यान, गोकुळ शिरगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अजित काटे यांच्या मोटरसायकल चोरीचा आरोपी मलेशा रावसाहेब येळगुडे (वय २४, रा. गोकुळ शिरगाव, मूळ रा. नाइंग्लज, कर्नाटक) हा गोकुळ शिरगाव येथील नरसिंह सर्व्हिसिंग सेंटरजवळ येणार आहे.माहिती मिळताच, गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपी मलेशा येळगुडेला पकडले. त्याच्याकडे तपासणी केली असता, अजित काटे यांची चोरी झालेली मोटरसायकल सापडली. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता, त्याने आणखी ६ मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ७ मोटरसायकली जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत १,२९,५०० रुपये आहे. या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव आणि कागल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक चोरीच्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे.हा यशस्वी तपास गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या सहा पोलीस निरीक्षक टी. जे. मगदुम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख, संदेश कांबळे, महादेव गुरव, दीपक मोरे, अमर पाटील, भरत कोरवी, विनोद कुंभार, इजाज शेख आणि दिलीप ईदे यांच्या पथकाने केला आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.