शिक्षण, पत्रकारितेबरोबरच रघुनाथ दळवी जपतायेत सप्तसूर.

 शिक्षण, पत्रकारितेबरोबरच रघुनाथ दळवी जपतायेत सप्तसूर.

------------------------------------------- 

गगनबावडा प्रतिनिधी  

सुनिल मोळे

------------------------------------------- 

   खेरीवडे :_तालुका गगनबावडा येथील रघुनाथ दळवी हे नांव ग्रामीण व शालेय संगीताच्या क्षेत्रात परिचित होत आहे. शालेय शिकवणी बरोबरच हार्मोनियमवादक म्हणून ते आपले स्थान निर्माण करत आहेत, शिवाय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा शिक्षक,  अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख वाढत आहे. कोणतीही शिकवणी न लावता अगदी स्वबळावर स्वकर्तुत्वावर संगीत वादन, गायन शिक्षण त्यांनी घेतलं . यूट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना आत्मसात करून त्यांनी घेतल्या आहेत. हसतमुख प्रसन्न चेहरा, हजरजबाबीपणा, नेमक्या शब्दात आपल्या मनातला आशय बोलून व्यक्त करण्याची कला, श्रोत्यांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची हातोटी वगैरे अनेक पैलू त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वात आहेत. दळवी हे विद्या मंदिर धुंदवडे तालुका गगनबावडा येथे तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.


लहानपणापासूनच आध्यात्मिक संस्कार लाभलेल्या वारकरी संप्रदयातील  घरात रघुनाथ दळवी यांचा जन्म झाला . साहजिकच गायन, वादन, भजन अशा माध्यमातून लहानपणापासूनच एक वेगळी ओळख निर्माण झाली . प्राथमिक शाळेपासून विविध स्पर्धेत गायन, समुहगीत, समुद्र अशा स्पर्धेच्या माध्यमातून एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक, गायन असा त्यांचा प्रवास सुरू आहे. गावातील व भागातील अनेक वारकरी संप्रदायातील कार्यक्रमांना आणि सोंगी भजनांना ही ते संगीत व गायन देत आहेत. गायनाची आवड असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना विविध गाण्याचे सूर लावून सराव घेतात. त्यांच्या जवळ असलेल्या कौशल्यामुळे शाळेचा कुठलाही कार्यक्रम बहारदार होतो. अर्थात त्यांच्या शाळेतील सहकाऱ्यांची ही त्यांना भक्कम साथ आहे. 


कितीतरी सदाबहार गाणी वाजवून ती ऐकणार्‍याला पुन्हा त्या दूनियेत घेवून जातो. त्यामुळेच दळवी यांचे हार्मोनियमचे सूर कितीही दूरुन कानावर पडले तरी पाऊले आपोआपच त्यांच्या दिशेने पडू लागतात. त्यामुळे रस्त्याने जाणारे-येणारे हमखास त्यांच्याजवळ थांबतात. जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक वर्षी संपन्न होणाऱ्या केंद्र, तालुका, जिल्हा अशा स्पर्धेमध्ये तसेच महाविद्यालयीन जीवनात अनेक वेळा जिल्हा, विभागीय स्तरावरती चमकदार कामगिरी दळवी यांनी केली आहे.  


 एम .ए .सीटीसी असलेल्या रघुनाथ दळवी यांना शिक्षणाबरोबर पत्रकारिता क्षेत्रात आवड निर्माण झाल्याने या क्षेत्रात सामाजिक समस्या, शैक्षणिक समस्या,  राजकीय अशा विविध क्षेत्रात ते विपुल  लेखन करत आहेत. यामधूनच त्यांना 2021 चा जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील आचार्य प्र .के .अत्रे हा पुरस्कार देखील मिळाला . परिस्थितीची सामना करत दळवी यांचा आजपर्यंतचा प्रवास हा खूप आनंददायी झाला आहे. शाळेमध्ये काम करत असताना विद्यार्थी हित केंद्रबिंदू मानून आज पर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेवून शाळेचा नावलौकिक वाढवण्यास त्यांनी मदत केली आहे.





चौकट - मी खरा घडलो तो आमच्या शाळेमुळेच. आमच्या धुंदवडे शाळेमध्ये सकाळी सुरू होणारा परिपाठ हा संगीत परिपाठ असायचा.  त्या माध्यमातून अनेक स्पर्धा व्हायच्या. यामध्ये मी ढोलकी , हार्मोनियम वादनामध्ये सहभागी व्हायचो. यासाठी प्राथमिक शाळेतील अनेक गुरुवर्यांनी मला संधी दिली, पाठिंबा दिला त्याचबरोबर दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक पत्रकार बंधूंनी मला पाठिंबा दिला. त्यांचा मी ऋणी आहे. 

रघुनाथ दळवी, खेरीवडे, तालुका गगनबावडा

कोल्हापूर विभाग

चौकट- माणसाची बौद्धिक आणि भावनात्मक प्रगती करायची असेल तर त्याची कलात्मक प्रगती होणे अत्यंत आवश्यक असते. ज्ञानाबरोबरच त्याची भावनिक प्रगती, सर्जनशीलतेत वृद्धी, बौद्धिक प्रगती आणि मनाचा समतोल राखण्याचे काम कलांच्या व्यासंगातून आणि शिक्षणातूनच केले जाते. मुलांना संगीताचे प्राथमिक ज्ञान देताना आपल्या कलांविषयी त्यांना सांगताना त्यांच्यातील सुप्त कलांना प्रोत्साहन देणे, हेही कला शिक्षकाचे काम आहे. अशीच कला रघुनाथ दळवी आपल्या गायन वादनातून जोपासत आहेत.


एम जी पाटील, लोकनियुक्त सरपंच, धुंदवडे

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.