माळेवाडी (ता. शिराळा) येथे घरात घुसलेला बिबटयाअखेर जेरबंद.

माळेवाडी (ता. शिराळा) येथे घरात घुसलेला बिबटयाअखेर जेरबंद.


----------------------------------

बच्चे सावर्डे प्रतिनिधी 

 सुनिल पाटील 

----------------------------------

कोकरुड :  कोकरुड पैकी माळेवाडी ता.शिराळा येथील अश्विनी अरुण गोसावी या महिलेने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला कोंडून घातल्यामुळे त्यास जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.

     याबाबत कोकरूड पोलिस, वन विभाग व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माळेवाडी येथील असलेल्या गोसावी वस्तीत बाळू आनंदा गोसावी यांचे दुमजली घर असून, खाली ते त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. तर वरच्या मजल्यावर असलेली खोली अडगळीचे सामान व इतर साहित्य,कपडे सुकविण्यासाठी वापरतात. या खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा असल्याने रविवारी शेजारी असलेल्या शौचालयाचा सहारा घेत रात्रीच्या वेळी बिबट्याने दरवाजा मधून आत मध्ये घुसून खोलीत असलेल्या कॉटखाली बसला होता. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी गोसावी या वाळवण्यासाठी टाकलेली कपडे आणावयास गेल्या असता त्यांना कॉटखाली काहीतरी बसलेले दिसले. प्रथम दर्शनी त्यांना कुत्रे आहे असे वाटले व त्यांनी धुडकवन्याचा प्रयत्न केला. तसा तो गुरगुरु लागला बिबट्या आहे हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत खोलीच्या बाहेर येत बाहेरून कडी लावली, व घरच्या लोकांना सांगितले. ग्रामस्थांच्या मदतीने कोकरूड पोलिसांना तत्काळ माहिती दिली. एपीआय जयवंत जाधव यांनी तात्काळ सदर ठिकाणी बंदोबस्त लावत वनविभागास माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनपाल अनिल वाजे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत  बोलवत पिंजरा रेस्क्यू टीम बोलावली व बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

       सांगलीचे उप वनसंरक्षक सागर गवते,सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचे मार्गदर्शनाखाली  वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे,सुनील कुरी,स्वाती कोकरे,रेस्क्यू टीमचे येथील सुशीलकुमार गायकवाड, युनूस मणेर, संतोष कदम, गौरव गायकवाड, विशाल चौगुले, संजय पाटील,सचिन पाटील, राहुल गायकवाड यांनी धाडसाने बिबट्यास जेरबंद करून नैसर्गिक आदिवासात सोडले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.