पेठवडगाव येथे आमदार चषक महायुती मानाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन.
पेठवडगाव येथे आमदार चषक महायुती मानाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
किशोर जासूद.
--------------------------------
पेठवडगाव : पेठवडगाव येथे १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार चषक महायुती मानाची दहीहंडी उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू प्रेमी यांच्यावतीने प्रतिवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पेठवडगाव येथे महायुती मानाची दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. काही वर्षातच आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांचा हातकणंगले विधानसभा मतदार संघातील लोकप्रियतेमध्ये वाढ होवून विधानसभा निवडणूकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले. आमदार माने यांनी आपल्या लोकसंपर्कातून मतदार संघातील जनतेमध्ये आपली वेगळी अशी प्रतिमा तयार केली आहे. सामान्य माणसांचे बापू आणि युवकांचे आयडॉल बापू अशी आपली छाप लोकमनावर पाडण्यात ते यशस्वी झाले. नेहमी त्यांनी गणेशचतुर्थी, दहीहंडी सारख्या सार्वजनिक उत्सवांना प्रोत्साहन दिले.
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू प्रेमी यांच्यावतीने पेठवडगाव येथे आमदार चषक महायुती मानाची दहीहंडी उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवाकरीता राजकीय, सामाजिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिध्द मराठी सिनेतारिका तेजा देवकर, तेजल शिंदे सुप्रसिध्द रीलस्टार प्रतिक्षा सुर्यवंशी, सिध्दू, रवि दाजी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक कलाकार व रीलस्टार यांची उपस्थिती या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदिका गायत्री कुलकर्णी या करणार आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदार संघातील नागरीकांना ही दहीहंडी म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.
सर्व नागरीकांनी नगरपालिका चौक पेठवडगाव येथे १९ ऑगस्ट २०२५ रोजी होत असलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू प्रेमी यांच्यावतीने आयोजित या आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दहीहंडी गोपाळांचे मनोबल वाढवावे आणि सर्व आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे निवेदन दहीहंडी उत्सव नियोजन समितीमार्फत नियोजनासाठी झालेल्या बैठकीतील प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे, यावेळी माजी नगराध्यक्ष पेठवडगाव मोहनलाल माळी, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, उद्योगपती अमोल हुक्केरी, भाजपा वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेना शहराध्यक्ष, अक्षय मदने, वैभव हिरवे, डॉ. अभय यादव, सुनिल माने, प्रविण कराडे, जगन्नाथ माने, बंडा गोंदकर, संतोष ताईंगडे, सतीश जोगदंड, अनिल माने, सागर भोसले, इंजि. दिनेश सनगर स्वीयसहाय्यक सुहास राजमाने यांचेसह पेठवडगाव परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक, आमदार प्रेमी उपस्थित होते.
Comments
Post a Comment