राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे , पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी उघडले.
राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे , पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी उघडले.
-----------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
राधानगरी पश्चिम भागामध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित बुधवारी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर निरूखे यांनी नेक्स्ट मराठी चैनल चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली
राधानगरी पश्चिम भागामध्ये गेली दोन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असल्याने राधानगरी धरणाचे बुधवारी रात्री 11: 3 मिनिटांनी ते मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटापर्यंत पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरण परिसरात आज सकाळी सहा पर्यंत , 96 मिलिमीटर पाऊस पडला असून पाच स्वंचालित दरवाज्यातून 71 40 क्यूसेक पाण्याची विसर्ग होत आहे तर बी ओ टी मधून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाची पाण्याची पातळी ३४७.५१ फूट व पाणीसाठा 836 टीएमसी आज गुरुवारी सकाळी सहा पर्यंत 96 मिलिमीटर व एक जून 28 ऑगस्ट अखेर 49 55 मिलिमीटर पाऊस झाला असून भोगावती नदीपात्रामध्ये एकूण 8640 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे भोगावती नदी काठाच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान राधानगरी जनसंपदा विभागाच्या शाखा अभियंता समीर निरुखे यांनी केले आहे
Comments
Post a Comment