मुसळधार पावसामुळे कोदवडे येथे भिंत व जनावरांचे शेड कोसळले.लाखोंचे नुकसान.
मुसळधार पावसामुळे कोदवडे येथे भिंत व जनावरांचे शेड कोसळले.लाखोंचे नुकसान.
----------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
----------------------------
कळे:- पन्हाळा तालुक्यातील कोदवडे येथे मुसळधार पावसामुळे शेतकरी विठाबाई बंडु डकरे यांची राहत्या घरांची भिंत कोसळली. यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
तसेच याच गावात दुसर्या घटनेमध्ये
मारुती रामचंद्र परीट यांची नऊ महिन्याची गाभण गाय शेड अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली.त्यामुळे शेड मालक व गाय मालक यांचे एकुण एक लाख दहा हजार रुपये नुकसान झाले.
सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून धामणी खोऱ्यातील कोदवडे ता पन्हाळा येथील मारुती परीट यांची नऊ महिन्याची गाभण असलेल्या गाईच्या अंगावर खापरी व पत्र्यासह शेड पडल्याने ती जागीच मरण पावली.तसेच शेड मालक नथुराम गणपती शियेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.परीट हे शेती बरोबर दुग्ध व्यवसाय करतात.त्यांचे जनावरांचे शेड आहे पण ते मोडकळीस आल्याने त्यांनी गावातीलच नथुराम गणपती शियेकर यांच्या जनावरांच्या शेडात काही दिवसांपासून गाय बांधत होते. तरीही काळाने डाव साधला आणि मारुती परीट यांची नऊ महिन्याची गाभण गाय अखेर मृत्यूच्या तावडीत सापडली.
त्यानंतर घटनास्थळी तात्काळ धाव घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय सावंत,तलाठी कार्यालयातील कोतवाल दिपक दळवी,शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रशांत पोवार,सरपंच पौर्णिमा ढेरे यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला.त्यानंतर डॉ सावंत यांनी शवविच्छेदन करत रिपोर्ट पाठवला.गणेश चतुर्थी च्या तोंडावर हाता तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावुन घेतला.परीट कुटुंबीयांवर दुभत्या गाईच्या जाण्याने आर्थिक संकट कोसळले आहे.त्यामुळे प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेत शेड मालक शियेकर व परीट व डकरे कुटुंबियास लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
कोल्हापूर विभाग

No comments: