मेन राजाराम मध्ये आरती पाठांतर स्पर्धा उत्साहात साजरी.

 मेन राजाराम मध्ये आरती पाठांतर स्पर्धा उत्साहात साजरी.

---------------------------------------

बच्चे सावर्डे प्रतिनिधी 

सुनिल पाटील 

---------------------------------------

 कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी *आरती पाठांतर स्पर्धा* घेण्यात आल्या.

   आरती म्हटल्याने भक्ती,श्रद्धेची अभिव्यक्ती होऊन आत्मिक शुद्धी प्राप्त होते.तसेच यामुळे मनाला शांतता व समाधान मिळते.सध्या सोशल मीडिया, मोबाईल मुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक आरत्या, अथर्वशीर्ष पठण पाठ नसून या संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आरत्या पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

    या स्पर्धेत कु.श्रृतिका जगन्नाथ कोंडा (प्रथम),कु.श्रद्धा पोपट कोळी (द्वितीय),कु.कवितादेवी सुखेन,कु.तारा इळीगेर(तृतीय),कु.मोक्षदा चोपडे (उत्तेजनार्थ) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस, प्रमाणपत्र देऊन प्राचार्य डॉ गजानन खाडे, उपप्राचार्य प्रा वनिता खडके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी स्पर्धा विभाग प्रमुख प्रा.सुषमा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा बाबासाहेब माळवे,प्रा अनिल लाड, प्रा बी टी यादव,प्रा दिपा लोहार,प्रा भाऊसाहेब धराडे,प्रा राहुल देशमुख, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी,विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.