गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले.कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले.कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई.
-----------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------
सातारा जिल्हयात दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ या कालावधीत सार्वजनिक व घरगुती गणेश उत्सव होत असुन दिनांक ०५/०९/२०२५ रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे.
सातारा जिल्हयात एकुण ७,८०० सार्वजनिक गणेश मुर्तीची २,५४,४३९ घरगुती गणेश मुर्तीची स्थापना होणार आहे. सातारा जिल्हयात या वर्षी एकुण ५४२ गावात 'एक गाव एक गणपती' योजना राबविण्यात येत आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांचे अनुषंगाने दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ या कालावधीत ०१ पोलीस अधीक्षक, ०१ अपर पोलीस अधीक्षक यांचे सह ०८ पोलीस उपअधीक्षक व १४० अधिकारी, १८४० पोलीस अंमलदार, ०१ एस. आर.पी.एफ कंपनी, ३ आर.सी.पी.पथक, ०१ क्यूआरटी पथक, ११०० गृहरक्षक, इतके मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. जिल्हयामध्ये निघणाऱ्या मिरवणुका व इतर कार्यक्रमावर ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे सह ७ ड्रोन कैमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
सातारा जिल्हया पोलीस दलाच्या वतीने सातारा शहर, कराड शहर, फलटण, वाई, या प्रमुख शहरासह संपूर्ण जिल्हयामध्ये दंगा काबु योजना रंगीत तालिम व रूट मार्च कोबिग ऑपरेशन घेण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा शहर, कराड शहर या प्रमुख शहरामध्ये शांतता कमिटी मिंटीग घेण्यात आली आहे. उपविभागीय स्तरावर व पोलीस ठाणे स्तरावर शांतता कमिटी सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील यांच्या बैठका घेवून गणेशोत्सव अनुषंगाने त्यांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे की, सामाजिक ऐक्य/सलोखा वाढीस लागेल अथवा देशभक्तीपर देखावे उभे करावेत. मिरवणुकीच्यावेळी जातीय सलोखा भंग होईल अशा प्रकारच्या प्रक्षोभक/आक्षेपार्ह घोषणा देण्यात येवू नयेत. दर्शनासाठी महिला व पुरूषांकरिता स्वंतत्र लाईन करावी, गणेशोत्सवा दरम्यान आक्षेपार्ह पोस्टर्स व देखावे लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. परवानगी शिवाय होडींग, बोर्ड लावू नयेत. प्लाझमा, लेडार बिमसह लेझर लाईट, साउंड प्रेशर मिड, यांचेवर बंदी असल्याने त्यांचा वापर करणार नाहीत.
गणेशोत्सव अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई १४६५ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच १०३ आरोपींना गणेशोत्सव कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्यान्वये तातपुरत्या तडीपार करण्यात आलेले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये १५ इसमांना तडीपार करण्यात आलेला आहे. दारूबंदीचे ३१ प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत,
तसेच ध्वनीप्रदुषण कायद्याखाली दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास नागरीकांनी त्यांच्या तक्रारी डायल ११२ व सातारा जिल्हयातील कॉमन युजर ग्रुप अंतर्गत पोलीस ठाण्यास असलेल्या मोबाईल नंबरवर फोनद्वारे व व्हॅटसंपवर मेसेजद्वारे करू शकतात, याकरीता सातारा जिल्हयातील पोलीस वेब साईडवर सर्व CUG नंबर उपलब्ध आहेत.
सर्व गणेशोत्सव मंडळ यांनी ध्वनी प्रदूषण कायद्याने दिलेल्या मर्यादेचे पालन करावे या उपरही नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन करताना मिळुन आल्यास नाईलाजास्तव पोलीसांना अशा मंडळांवर कारवाई करणे भाग आहे.
No comments: