राजर्षी शाहू पतसंस्थेची सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात.
राजर्षी शाहू पतसंस्थेची सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात.
------------------------------
जोतीराम कुंभार
------------------------------
मुरगूड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात १०७६ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल साध्य केली असून, चालू आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. ही संस्थेची अभिमानास्पद प्रगती असून, सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी कामगिरी आहे. मा.खासदार संजयदादा मंडलिक आणि युवानेते पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक मा.ॲड.विरेंद्रसिंह मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे सभापती दतात्रय तुकाराम सोनाळकर मामा हे अध्यक्ष्यस्थानी होते. यावेळी सोनाळकर मामा म्हणाले अहवाल सालात संस्थेकडे, राखीव निधी व फंड ९कोटी ०६ लाख रु, ठेवी, ९३ कोटी १८ लाख, कर्ज वाटप ६४ कोटी ८६ लाख रु. गुंतवणूक ३८ कोटी ३८ लाख रु. खेळते भांडवल १०७ कोटी ९६ लाख रु, वार्षिक उलाढाल १०७६ कोटी ६४ लाख व नफा १ कोटी ५४ लाख १० हजार ६२५ रु. इतका झाला आहे.
संस्थेच्या मुख्य कार्यालयासह शाखा मुरगूड, सावर्डे बु., सदाशिवनगर, बाचणी, कापशी (से), सिध्दनेर्ली (नदिकिनारा) कूर येथे शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखा संगणकीकृत असून संस्थेच्या ३ ठिकाणी स्वमालकीच्या इमारती आहेत. सरवडे व गडहिंग्लज येथे २ नवीन शाखांना मंजुरी मिळाली आहे. ग्राहकांना लॉकर सुविधा उपलब्ध केलेली आहे. ऑडीट वर्ग अ असून सभासदांसाठी एक लाख रुपये अपघाती विमा उतरविलेला आहे. संस्थेचा सभासद मयत झालेनंतर त्यांचे उत्तर कार्यासाठी निधी दिला जातो.
संस्थेने सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये आश्रमशाळा चिमगाव येथे १५० गरीब व गरजू विद्यार्थाना जाजम वाटप केले आहे. आले. तसेच डोळे तपासणी शिबीरात १५२ लोकांना लाभ व २५ लोकांची मिरज येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वस्ती शाळा सावर्डे बु।।. कडे तिजोरी भेट कार्यक्रम पार पडला. सभेत संस्थेचे माजी संचालक, माजी सेवक, १०वी व १२वी उत्तीर्ण सभासद पाल्यांचे सत्कार केले. सभेस सखाराम सावर्डेकर, आनंदा पाटील, एम.एस. पाटील, मारुती रावण, राजेश गोधडे, एम. ए. पाटील, दिगंबर परीट यांनी चर्चेत भाग घेतला. याप्रसंगी उपाध्यक्ष रविंद्र ढेरे, संचालक ॲड. विरेंद्र मंडलिक भैय्यासाहेब, रामचंद्र भोपळे, एन. वाय पाटील, प्रदिप चव्हाण, नारायण मुसळे, दत्तात्रय भोई, वैशाली मंडलिक , सविता कळांद्रे यांनी समाधान कारक उत्तरे दिली. संचालक एन. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अहवाल व विषय पत्रीकेचे वाचन जनरल मॅनेंजर डी. एन. पाटील यांनी केले शेवटी आभार संचालक नारायण मुसळे यांनी मानले.
Comments
Post a Comment