गौरीच्या मुखवट्यांनी बाजारपेठा सजल्या.

 गौरीच्या मुखवट्यांनी बाजारपेठा सजल्या.

---------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

---------------------------------

      गणेशोत्वाची बाजारपेठांमध्ये सणाची लगबग वाढू लागली आहे. यंदा विशेष लक्ष वेधून घेत आहेत ते गौरीचे आकर्षक मुखवटे. विविध रंग, आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेले हे मुखवटे बाजारपेठेची शोभा वाढवत आहेत.


कुंभोज सह  शहरांतील तसेच ग्रामीण भागांतील बाजारांमध्ये गौरीच्या मुखवट्यांची मोठी मागणी आहे. पारंपरिक मुखवट्यांबरोबरच आधुनिक शैलीत साकारलेले मुखवटे ग्राहकांना भुरळ घालत आहेत. विशेषतः पर्यावरणपूरक साहित्याने बनवलेले मुखवटे यंदा अधिक लोकप्रिय ठरत आहेत.


स्थानिक कारागीरांनी आपल्या कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना दाखवताना मुखवटे सजवले आहेत. रंगीबेरंगी काठ, कुंकवाची बिंदिया, मोत्यांचे हार आणि केशरचना यामुळे हे मुखवटे खऱ्या गौरीप्रमाणे भासतात.


एक व्यापारी विनायक कुंभार म्हणाले, “यावर्षी ग्राहकांना पारंपरिकतेसोबत नाविन्य हवे आहे. त्यामुळे आम्ही विविध प्रकारचे मुखवटे आणले आहेत.”यामुळेच बाजारपेठा फुलून आल्या असून, सणासुदीच्या वातावरणात उत्साहाची भर पडली आहे. गौरी आगमनासाठी घराघरात तयारी सुरू असताना हे मुखवटे श्रद्धा आणि सौंदर्याचा मिलाफ घडवून आणत आहेत. परिणामी ग्रामीण भागात मंदिराच्या ठिकाणी गौरीचे मुखवटे विक्रीसाठी ठेवण्यात आली असून यंदा गौरीच्या मुखवट्याच्या घरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे उद्या दुपारनंतर गौरीची आगमन होणार असून दोन दिवस गौरी सणाचे स्वागत केले जाणार आहे.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.