देशप्रेमी तरुण मंडळांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरतीआगळ्या-वेगळ्या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 देशप्रेमी तरुण मंडळांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरतीआगळ्या-वेगळ्या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

--------------------------------

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

--------------------------------

गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशप्रेमी तरुण मंडळाने यंदा एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली, तसेच त्यांच्या सेवाभावाबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


या उपक्रमात सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी आदींना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक करत त्यांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


मंडळाचे अध्यक्ष दिपक कोळी यांनी सांगितले की, “आपल्या गावासाठी सातत्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. समाजात एकोपा व सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठीच हा उपक्रम राबवला.”


या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर, महिलावर्ग, युवक आणि बालगोपाळांची मोठी उपस्थिती होती. आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आले आणि मंडळाच्या वतीने स्वच्छतेचा संदेश देत पुढील सामाजिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली.


गणेशोत्सवात केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक भान जपणारा देशप्रेमी तरुण मंडळाचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायक ठरतो आहे. यावेळी माजी सरपंच माधुरी घोदे ,प्रभाकर घोदे, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार घोदे, माजी उपसरपंच तुषार कोळी, तेजस कोळी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.