कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खड्यात आंघोळ करून निषेध.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खड्यात आंघोळ करून निषेध.
------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
------------------------------
कळे:- कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर लक्ष वेधण्यासाठी (देव देश धर्म रक्षक संघटना) छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्यकर्ता अक्षय बेलेकर यांनी जगावेगळा निषेध व्यक्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर किरवे येथे रस्त्यातील खड्ड्यात साचलेल्या चिखलात बसून त्यांनी थेट अंघोळ करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची दुर्दशा कायम असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. दररोज अपघात होण्याची शक्यता असूनही संबधित विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. त्वरित रस्त्यांतील खड्डे मुजवून जनतेला दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर विभाग
Comments
Post a Comment