गणेश चतुर्थी पूर्वी कळे बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन -सोनाजी पाटील.
गणेश चतुर्थी पूर्वी कळे बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन -सोनाजी पाटील.
----------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
9595316266
----------------------------------
कळे:- पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ मुख्य महामार्गावरील खड्डे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात मुरूम टाकून भरून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कळे येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांनी दिला.
पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ ही आसपासच्या 40 ते 50 गावांना जोडणारी प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परंतु कळे ते पुनाळ फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने व ऐन पावसाळ्यात त्यामध्ये पाणी तुंबून तळे झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येत्या गणेश चतुर्थीला आसपासच्या गावातून कळे येथे अनेक नागरिक व तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेश मूर्ती घेण्यासाठी येतात परिणाम रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांचे हाल होणार आहे. त्यामुळे कळेतील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते व व्यापाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसात खड्डे भरले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर विभाग

No comments: