अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा ठप्प, हैदराबादची ही काही दिवस राहणार बंद ऑपरेशन इशूच्या नावाखाली विमानसेवा थांबली.

 अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा ठप्प, हैदराबादची ही काही दिवस राहणार बंद ऑपरेशन इशूच्या नावाखाली विमानसेवा थांबली.

-------------------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

  पी. एन देशमुख.                      

-----------------------------------------

                                           अमरावती : - केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू झालेले अमरावती ते मुंबई एअर ची विमानसेवा तूर्त बंद झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे अमरावतीसह हैदराबादची विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

१ किंवा १५ सप्टेंबर२०२५ पासून एअर अलायन्स सेवा सुरू होईल अशी सूत्राची माहिती आहे. अमरावती विमानतळावरुन  १६ एप्रिल२०२५ रोजी एअर अलाइनचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावलले होते सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस मुंबई अमरावती मुंबई ही विमान सेवा सुरू आहे मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे अमरावती ते मुंबई दरम्यान काही विमान फेऱ्या केल्या रद्द करण्यात आले आहे मात्र मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले मात्र२१ ऑगस्ट पासून अमरावती मुंबई एअर अलाइनची विमानसेवा बंद झाली आहे एअर अलाइनच्या विमानात तांत्रिक बिघाडाची युद्ध स्तरावर दुरुस्ती सुरू आहे एअर आलाय चे हैदराबाद ते मुंबई विमान सेवा तूर्त रद्द करण्यात आली आहे मात्र २१ ऑगस्ट पासून विमान प्रवास करणाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. ऑपरेशन इशू च्या नावाखाली विमान सेवा थांबली असली तरी एअर अलाइनच्या विमानात मोठा बिघाड झाल्याची माहिती आहे मुंबई ते अमरावती मुंबई ते हैदराबाद फेऱ्या रद्द करण्यात आले आहे या संदर्भात अमरावतीच्या विमानतळ अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता नो कॉमेंट असे उत्तर मिळाले हे विशेष एअर अलायन्स विमानाने अमरावती ते मुंबईकडे ये जा करणाऱ्यांची संख्या ५0 ते६0 एवढी असते साधारणतः विमान बुकिंगची अशीच आकडेवारी आहे त्यामुळे मुंबई अमरावती विमान सेवा सुरळीत सुरू असल्याचे चित्र ७२ ए टी आर ही विमान सेवा असून ३५00ते ४00 या दरम्यान प्रति प्रवासी तिकीट दर आकारले जाते मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दहा दिवस विमानसेवा ब्रेक लागणार आहे. मुंबई अमरावती मुंबई एअर अलाइन्स विमान सेवा सुरळीत व्हावी यासाठी केंद्रीय नगरी विमान वाहतूक मंत्री , कीजारावु राममोहन नायडू यांना २८ ऑगस्ट रोजी पत्र वजा मेल पाठविला आहे हे एकच विमान आठवड्यातून तीन फेऱ्या करते त्यामुळे या हवाई मार्गावर सुसज्ज आणि नवीन विमा मिळावी अशी मागणी केली आहे याबाबत अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.