गुणवत्तेच्या बळावर यश मिळते – प्रदीप गुरव यांचे प्रतिपादन.

 गुणवत्तेच्या बळावर यश मिळते – प्रदीप गुरव यांचे प्रतिपादन.

--------------------------------------

बाजारभोगाव (ता. पन्हाळा

सुदर्शन पाटील 

---------------------------------------

“कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केले तर देव त्याचे फळ नक्की देतो. योग्य नियोजन, स्पष्ट व्हिजन आणि ध्यास असेल तर यश दूर राहत नाही,” असे प्रतिपादन गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप गुरव यांनी केले.


बाजारभोगाव (ता पन्हाळा) येथील श्री सिद्धेश आयटीआय संस्थेत विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केडीसी बँकेचे निरीक्षक नितीन हिर्डेकर यांनी भूषवले.


यावेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनील दळवी म्हणाले, “समाजकार्यात दिखावा करणारे बरेच असतात, पण खर्‍या अर्थाने प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करणाऱ्या संस्था अत्यंत कमी आहेत. गुणवत्ता आणि प्रयत्न यांची जोड दिल्यास जीवनाला खरी दिशा मिळते.”

     कार्यक्रमात पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबईचे वरिष्ठ लिपिक मयुरेश चौगले, मंत्रालयाचे सहाय्यक अतुल सावंत, विद्युत सहाय्यक सानिका बाडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  यावेळी समारंभास माजी उपसरपंच युवराज पाटील, संदीप पाटील, लेखक शहाजी बाडे, संगीत नाटक मंडळ पुनाळचे सदस्य, तसेच सुभाष सावंत, अमोल काटकर, विकास खोत, विकास पाटील, रत्नाकर कांबळे, विशाल तुरंबेकर, पत्रकार धनाजी गुरव, अमित पाटील, संतोष पाटील संस्थेचे संस्थापक संभाजी बाडे व प्राचार्य सचिन बाडे यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एमएससीआयटी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेच्या शिक्षकांनी केले.


फोटोओळ - गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप गुरव याचा सत्कार करताना मान्यवर

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.