तात्काळ टोलवसुली बंद करा अन्यथा "स्वाभिमानी स्टाईल"ने टोल नाके बंद करू किणी टोल नाक्यावर स्वाभिमानी आक्रमक.
तात्काळ टोलवसुली बंद करा अन्यथा "स्वाभिमानी स्टाईल"ने टोल नाके बंद करू किणी टोल नाक्यावर स्वाभिमानी आक्रमक.
-------------------------------
अंबप/ प्रतिनिधी
किशोर जासुद
-------------------------------
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर रस्ते खराब असतील किंवा रुंदीकरणाचे काम सुरू असेल,तर अशा मार्गांवर टोल आकारणी करता येणार नाही.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज किणी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करत कोल्हापूर ते पुणे मार्गावरील टोल वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली.सध्या पुणे-कोल्हापूर महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असून,रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.खड्डेच खड्डे, खराब सर्व्हिस रोड आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पुणेपर्यंतचा प्रवास सहा ते सात तासांहून अधिक वेळ घेत आहे.पावसाळ्यामुळे रस्त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टोल बंद करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे की,जर तात्काळ टोलवसुली बंद केली नाही,तर "स्वाभिमानी स्टाईल"ने टोल नाके बंद करण्यात येतील.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजित पोवार,धनाजी पाटील, सुधीर मगदूम,विक्रम पाटील,आण्णा मगदूम,नितेश कोगनोळे,राजू पाटील,उमेश पाटील,महावीर चौगुले,पिंटू शिरणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. वाहनचालकांतूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून,खराब रस्त्यांवर टोल आकारणी अन्यायकारक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने तात्काळ टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे
Comments
Post a Comment