गारगोटीत इंडिया आघाडीचे 'जवाब दो' आंदोलन.

 गारगोटीत इंडिया आघाडीचे 'जवाब दो' आंदोलन.

--------------------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी

 सलीम शेख 

--------------------------------------- 

गारगोटी  : केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि हरियाणा सरकार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने 'जवाब दो' आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गारगोटी येथील क्रांती चौकात इंडिया आघाडीच्या वतीने 'जवाब दो - जवाब दो' हे आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने निवडणुकीत भ्रष्टाचार करून लोकशाहीला धोका पोहोचवल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नुकतेच दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विरोधात आंदोलन केले होते, त्यावेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेचा निषेध म्हणून देशभरात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनात इंडिया आघाडीचे सर्व पक्ष तसेच लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.