श्री आळोबानाथ मंदिर येथेगोकुळाष्टमी उत्सव सांगता व दहीहंडी गोपाळकाला सोहळा मोठ्या भक्तीभावाने वातावरण पार पडला.
श्री आळोबानाथ मंदिर येथेगोकुळाष्टमी उत्सव सांगता व दहीहंडी गोपाळकाला सोहळा मोठ्या भक्तीभावाने वातावरण पार पडला.
--------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
--------------------------------
सातवे :श्री आळोबानाथ मंदिर येथे बुधवार दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी (श्रावण वद्य द्वादशी) संत सेना महाराज पुण्यतिथी, गोकुळाष्टमी उत्सव सांगता व दहीहंडी गोपाळकाला सोहळा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला.
या प्रसंगी सकाळी धार्मिक पूजा-अर्चा, कीर्तन व भजन या कार्यक्रमांनी वातावरण पावन झाले. दुपारी गोपाळकाळा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विवेकानंद शिशुविहार व विद्यामंदिर सातवे येथील विद्यार्थ्यांच्या दहीहंडी गोपाळ पथकांनी सहभाग घेतला. उत्साहाने उंच मानवपिरॅमिड रचून दहीहंडी फोडताच “गोविंदा आला रे”च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. गोपाळकाळ्याचा प्रसाद सर्व भक्तांना वाटप करण्यात आला. गावकरी, महिला मंडळे व तरुण मंडळांच्या सहकार्यामुळे सोहळा भव्यदिव्य झाला.
या सोहळ्याच्या माध्यमातून संत परंपरेचे स्मरण, सामाजिक ऐक्य व भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधला गेला.
Comments
Post a Comment