बोरबेट येथील महिला प्रस्तुत होऊन अर्भक मृत्यू व बाळतीन सुखरूप.
बोरबेट येथील महिला प्रस्तुत होऊन अर्भक मृत्यू व बाळतीन सुखरूप.
----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
गगनबावडा तालुक्यातील महिलेची 108 रुग्णवाहिकेमध्येच प्रस्तुती पण प्रस्तुती नंतर अर्भक बालकाचा मृत्यू व आई सुखरूप गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील महिला कल्पना आनंदा डुकरे वय 29 या महिलेला प्रसुती साठी सकाळी दहा वाजता ग्रामीण रुग्णालय गगनबावडा या ठिकाणी आणली असता त्या महिला प्रसूती कळ असल्याने त्या महिलेला प्रसूती रुग्णवाहिकेमध्ये उपचारादरम्यान अर्भक बालकाचा मृत्यू झाला व त्या महिलेच्या प्रकृतीमध्ये बदल झाल्याने पुढील उपचारासाठी सीपीआर कडे पाठवण्यात आले आहे त्यादरम्यान तालुक्यामध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे ठीक ठिकाणी मेन रोड वरती पाणी आल्याने रुग्णाची व आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली गगनबावडा मेन रोड वरती पाणी आल्याने 108 रुग्णवाहिकेचे चालक सतीश कांबळे यांनी तारेवरची कसरत करत रुग्णवाहिका पाण्यातून मार्ग काढत कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली कोल्हापूर गगनबावडा रोड वरती पुराचे पाणी असल्याने रुग्णाला गगनबावड्यातून असळज पर्यंत थेट गाडी वरून आणले व त्यांना खोकुरले पडवळवाडी येथील प्रवासी व स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका 108 मध्ये दाखल केले व खोकुरले दरम्यारुग्णवाहिकेमध्ये प्रस्तुती झाली व बाळाच्या आईचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले व बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले व नातेवाईकांचा आक्रोश पाहून जीव पिठाळून टाकणार होता
Comments
Post a Comment