केंद्र शाळा सडोली खालसा.डॉ शेंडकर मॅडम यांची सदिच्छा भेट!!
केंद्र शाळा सडोली खालसा.डॉ शेंडकर मॅडम यांची सदिच्छा भेट!!
केंद्र शाळा सडोली खालसा या शाळेस आणि शाळेच्या परसबागेस आज शिक्षण अधिकारी प्राथमिक जिं.प. कोल्हापूर मा. डॉक्टर मीना शेंडकर मॅडमउपशिक्षणाधिकारी माननीय आर् व्ही कांबळे साहेब यांनी भेट दिली. सोबत केंद्र प्रमुख एस व्ही पाटील,के वाय कुंभार सर्व शिक्षक स्टाप कुर्डुकर मॅडम जाधव मंजुषा मॅडम, नम्रता पाटील, दिपाली किरुळकर, मृणाली वाघरे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्री सुरेश कांबळे सर हेही उपस्थित होते.
माननीय शिक्षणाधिकारी मॅडम यांनी शाळेचा संपूर्ण परिसर पाहिला आणि परसबाग कशा पद्धतीने फुलविली आहे याची माहिती घेतली मुख्याध्यापक श्री सुरेश कांबळे सर यांनी शाळेविषयी व परस बागेविषयी इतंबूत माहिती दिली.
गेली दोन वर्षे ही परसबाग तयार करण्यामध्ये खूप परिश्रम करावे लागले,
प्रथम jcb च्या साहाय्याने मुरूम काढून घेतले व जमीन सपाट करून घेतली ती शेती योग्य करून घेतल्या नंतर नदीची लाल माती 20 ट्रॉ ल्या आणून, ती सपाट करून 3 फूट अंतर ठेवून सऱ्या काढल्या सेंदिया खात पसरून घेतले. ठिबक सिंचन, गांडूळ खत योजना सेंद्रिय खत पारंपरिक शेती व आधुनिक शेती यांचा मेळ घालून सहा गुंठ्यामध्ये गवारी भेंडी, वांगी, मिरची टोमॅटो, चवळी, श्रावण घेवडा, कोथिंबीर, अंबाडा वरणा,काकडी दोडका इत्यादी सर्व प्रकारचा भाजीपाला केलेला असून दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजाराचे उत्पन्न मिळालेला आहे हे पाहून मॅडमनी खूप समाधान व्यक्त केले.
ज्या ज्या शाळेमध्ये अशा प्रकारची जागा शिल्लक आहे त्या शाळेमध्ये कमवा व शिकवा या योजनेखाली शासनाच्या धोरणा प्रमाणे शिक्षकांनी परसबाग करण्यास कोणतीही हरकत नाही, यातून स्वनिर्मितीचा आनंद, श्रमप्रतिष्ठा,शेती विषयी आवड ही मूल्य विद्यार्थ्यांना शिकवता येतील, त्या मूल्यांची आपण अनुभूती दिले बद्दल अभिनंदन!! असेही मॅडम यांनी उदगार काढले.
तसेच शाळेत पहिली ते चौथीपर्यंत चे वर्ग असून सेमी इंग्लिश आहे पहिली ते चौथीपर्यंतची किमान 80% विद्यार्थी इंग्रजी स्पेलिंग सहीत अस्खलितपणे पुस्तकातील पाठाचे वाचन करतात हेही कमी कालावधी मध्ये पाहिले आणि सर्व शिक्षकांच्या कामाचे केंद्रप्रमुख सुरेश कांबळे सर यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
अंकुर परीक्षा out of गुण चार विद्यार्थी, प्रज्ञा शोध दोन pnp 2 विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी अभ्यासात पुढे आहेत.
आपण केवळ पुढारपण न करता सर्वच विभागात अतिशय मनापासून काम करत आहात हे विशेष बाब आहे. आपली नेमणूक ज्या कामासाठी झालेली आहे ते काम प्रामाणिकपणे केल्यास अश्या प्रकाची कामे होतात. हे ही आवर्जून सांगितले
मॅडमनी हेही सांगितले की, आपण केवळ शिक्षकच नाही तर ही परसबाग पाहून आपण एक हाडाचे शेतकरी आहात हे या ठिकाणी दाखवून दिले आहे असे गौरवोद्गार काढले.
त्यांनी प्रथमच शाळेस भेट दिल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ बुके देऊळ यथोचित सत्कार करण्यात आला व परसबागेतील भाजी भेट देण्यात आली शाळेचे स्वच्छतागृह शाळेचा परिसर खेळाचे मैदान संगणक कक्ष वर्ग स्वच्छता या सर्व बाबी मॅडमनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केले.
या कामी ग्रामपंचायत शाळा कमिटी सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक या सर्वांचे सहकार्य असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक गोष्टी अग्रक्रमाने करता येतात व गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची कवाडे खुली करता येतात.
हेही मॅडमनी आवर्जून नमूद केले.
पुढील कार्यास शुभेच्छा देऊन आपल्या कार्यालयाकडे रवाना झाल्या.
जाता जाता आपणास नियमित केंद्र प्रमुख पद ही देणेबाबत कार्यवाही केली जाईल.
असेही सूचित केले.
Comments
Post a Comment