व्यसनाधीनतेपासून युवकांनी दूर राहावे.
व्यसनाधीनतेपासून युवकांनी दूर राहावे.
-------------------------------------------
गगनबावडा प्रतिनिधी
सुनिल मोळे
-------------------------------------------
श्री यशवंत माध्यमिक विद्यालय असंडोली येथे मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियाना अंतर्गत संस्कार शिबिर घेण्यात आले. यामध्ये 'व्यसनमुक्ती' या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्री दीपक गायकवाड. अध्यापक, केंद्रीय प्राथमिक विद्यालय असंडोली, प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले. सरांनी व्यसनमुक्ती हा विषय अतिशय समर्पक शब्दांमध्ये मांडला. व्याख्यानामध्ये सरांनी व्यसन म्हणजे काय? ते कसे जडते? त्याचा शरीर, कुटुंब, समाजावर कसा दुष्परिणाम होतो? व्यसनाचे प्रकार कोणते? व्यसनांपासून कसे दूर रहावे? व्यसनमुक्ती करण्याचे उपाय कोणते? या सर्व मुद्द्यांवर दैनंदिन जीवनातील उदाहरणासहित, ग्रामीण ढंगातील भाषा वापरून, अतिशय उत्कृष्ट शैलीमध्ये विद्यार्थी, पालक व उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री पांडुरंग पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरिता पाटील मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माळी सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री तानाजी घाटगे सरांनी केले.
कोल्हापूर विभाग
Comments
Post a Comment