Header Ads

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांकडून रूट मार्च.

 गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांकडून रूट मार्च.

-----------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

------------------------------------

 २७.०८.२०२५ ते दि.०६.०९.२०२५ या कालावधीत हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तसेच दि.०५.०९.२०२५ रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हे सण साजरे केले जाणार आहेत.


सदर सणांचे पार्श्वभुमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २९.०८.२०२५ रोजी १२.०० ते १२.५० वा या वेळेत मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती विमला एम ( भापोसे) उपविभागीय पोलिस अधिकारी शहरी विभाग सांगली यांचे उपस्थितीत सांगली शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला आहे. सदर रूट मार्च करीता पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी यांचेसह ०७ पोलीस निरीक्षक, १८ सपोनि/पोऊनि, १२६ पोलीस अंमलदार, २२ वाहतूक शाखा अंमलवार, ५५ होमगार्ड व एसभारपीएफ कडील २ प्लाटून असे मनुष्यबळ उपस्थित होते. सदर रूट मार्च करीता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालीकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राहूल रोकडे, शहर अभियंता श्री. फडके, कार्यकारी अभियंता एमएसईबी श्री. थोरात, श्री. घोरपडे, श्री. किर्तीकुमार पाटील, नगर अभियंता श्री. महेश मदने, शाखा अभियंता श्री. श्रीधर फडके उपस्थित होते.


सदरचा रूट मार्च स्टेशन चौक-राजवाडा चौक-पटेल चौक झाशी चौक गणपती मंदिर टिळक चीक गारमेंट चौक मारूती रोड ते छत्रपती शिवाजी महाराज असा काढण्यात आला असून रूट मार्च दरम्यान सांगली शहरातील गणपती विसर्जन मार्गाची देखील पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.


त्यानंतर दि.२९.०८.२०२५ रोजी १८,०० ते १९.०० वा. या वेळेत मिरज शहरात मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी रूट मार्च घेवून विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. सदर रूट मार्च करीला मा. मा.पोलीस अधीक्षक, सांगली, अपर पोलीस अधीक्षक सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांचेसह ०५ पोलीस निरीक्षक, ३० सपोनि/पोऊनि, २५० पोलीत अंमलदार, ५० होमगार्ड व एसआरपीएफ कडील २ प्लाटून असे मनुष्यबळ उपस्थित होते. सदरचा रूट मार्च हिरा हॉटेल चौक स्टेशन चौक दर्गा चौक पोलीस ठाणे -किसान चौक श्रिकांत चौक फुलारी चौक सराफ कष्टा गणेश तलाव असा काढण्यात आला आहे. नागरीकांना गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.