पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद.
पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
राधानगरी धरण परिसरात गेली तीन दिवसापासून पावसाळा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद झाले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभाग कडून देण्यात आली
राधानगरी धरण परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाळा जोर वाढल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरले असल्याने धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पैकी चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते पण पावसात जोर गेली तीन दिवसापासून कमी झाल्याने धरणाचे चार स्वंचलित दरवाजे बंद झाले असून धरण परिसरात आज शुक्रवारी सायंकाळी चार वाजता नऊ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाची पाण्याची पातळी 347 पॉईंट झिरो तीन फूट तर पाणीसाठा 8.27 टी एम सी इतका आहे तर ब्युटी पॉवर हाऊस मधून 1500 क्यू से क पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत असून एक जून ते एक ऑगस्ट 25 अखेर 3622 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाने दिली आहे
कोल्हापूर जिल्हा
Comments
Post a Comment