जयसिंगपूरातील सोनोग्राफी हॉस्पिटल्सवर प्रशासनाची कडक नजर!लिंग निवड तपासणी व अनियमिततेवर कारवाईची मोहिम.

 जयसिंगपूरातील सोनोग्राफी हॉस्पिटल्सवर प्रशासनाची कडक नजर!लिंग निवड तपासणी व अनियमिततेवर कारवाईची मोहिम.

-------------------------------

नामदेव भोसले

-------------------------------

मुलींच्या जन्मदरात होत असलेली घसरण व वाढती स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मोहिमेत जयसिंगपूरातील सोनोग्राफी हॉस्पिटल्सही प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. शहरातील विविध हॉस्पिटल्स व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करताना काही ठिकाणी नियमभंग आढळल्याची माहिती समोर आली आहे.


गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी रुग्णांचा एफ-फॉर्म नीट न भरलेला, तपासणीचे इत्यंभूत रेकॉर्ड अपूर्ण, तसेच यंत्रसामग्री वापरासंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. काही केंद्रांवर प्राथमिक कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे.


जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. सोनोग्राफी हॉस्पिटल्सना सर्व नोंदी काटेकोरपणे ठेवणे, प्रत्येक गर्भवती महिलेसंबंधी फॉर्म्स पूर्ण करणे व तपासणी नोंदी किमान दोन वर्षे राखणे बंधनकारक आहे.जन्मदरात घट साधारणतः एक हजार मुलांमागे ९५२ मुलींचे प्रमाण असताना राज्यातील काही भागात हे प्रमाण ८८० पर्यंत खाली गेले आहे. जयसिंगपूर परिसरातही मुलींचा जन्मदर घटत चालल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

जयसिंगपूरातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना प्रशासनाने इशारा दिला आहे — “नियमांचे पालन न केल्यास थेट परवाना रद्द होईल तसेच गुन्हे दाखल केले जातील.”

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.