कोरोची येथे वादातून युवकावर कटरने हल्ला, एक गंभीर जखमी.

 कोरोची येथे वादातून युवकावर कटरने हल्ला, एक गंभीर जखमी.



------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

संस्कार कुंभार 

------------------------------

कोरोची: येथील विवेकानंदनगर परिसरात एका किरकोळ वादातून एका युवकावर कटरने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अथर्व जितेंद्र चव्हाण (वय २६) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता अंकिता टेक्सटाईल्स, चिंतामणी गणेश मंदिरासमोर, विवेकानंदनगर, कोरोची येथे ही घटना घडली. प्रसाद विजय चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा चुलत भाऊ अथर्व चव्हाण याने कामगार सुमित याला काही काम सांगितले. याचा राग मनात धरून सुमितचा मित्र सचिन उमाशंकर कुमार (वय ३४) याने अथर्वशी वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादातून सचिन कुमार याने आपल्या हातातील रेडिअम कटरने अथर्व चव्हाण यांच्या उजव्या हातावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात अथर्व गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

याप्रकरणी प्रसाद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन कुमार विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस फौजदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.