राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे राजभवनात भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे राजभवनात भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा.
---------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
---------------------------------------
कोल्हापूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा 'भाजपा स्टार्टअप इंडिया'चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भरत पाटील यांनी राज्यपालांना शाल, श्रीफळ आणि महाराणी ताराराणी यांचा पुतळा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
या भेटीदरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि भरत पाटील यांच्यात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योगांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्यपालांना माहिती दिली.
या चर्चेदरम्यान, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यांनी भरत पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्या लवकरच सुटतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
या भेटीप्रसंगी राज्यपालांचे ज्येष्ठ बंधू सुब्रमण्यमजी देखील उपस्थित होते.
Comments
Post a Comment