श्री आळोबानाथ अन्नछत्र विभाग – पौर्णिमा प्रसाद परंपरेला पाच वर्षांचा यशस्वी प्रवास.

 श्री आळोबानाथ अन्नछत्र विभाग – पौर्णिमा प्रसाद परंपरेला पाच वर्षांचा यशस्वी प्रवास.

--------------------------------

सातवे प्रतिनिधी 

सुनिल पाटील 

--------------------------------

श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट, सातवे यांच्या अंतर्गत कार्यरत श्री आळोबानाथ अन्नछत्र विभाग तर्फे दर महिन्याच्या पौर्णिमेला भाविकांसाठी प्रसाद वितरणाची सेवा गेली पाच वर्षे अखंडित सुरू आहे.


यंदा श्रावण पौर्णिमा – रक्षाबंधन – या शुभदिनी जवळपास 300 ते 400 भाविकांनी ट्रस्ट हॉलमध्ये प्रसादाचा लाभ घेतला. या पौर्णिमेचे अन्नदाते होते माननीय श्री प्रवीण आनंदा पानसकर (सातवे), सध्या राहणार – आयर्लंड. तसेच श्री शिवदास बाळासो सुतार यांनी तीन किलो बुंदी प्रसादासाठी अर्पण केला.


सर्वांच्या सहकार्यामुळे, सेवेमुळे व मार्गदर्शनामुळे हा उपक्रम सातत्याने पार पडत असून ट्रस्टचे विश्वस्त, स्वयंसेवक, महिला प्रतिष्ठान कार्यकर्त्या यांचा सेवाभावी सहभाग लक्षणीय आहे.


पुढील पौर्णिमा – भाद्रपद पौर्णिमा – रविवार, दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न होणार असून, अन्नदाते असतील माननीय श्री आनंदराव ज्ञानदेव खामकर गुरुजी (सातवे), सध्या राहणार – कोडोली.


ट्रस्ट संयोजक समितीच्या वतीने सर्व दानशूर दात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. ज्यांना महिन्याच्या पौर्णिमेसाठी अन्नदान करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर ट्रस्ट संयोजक समितीशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.