शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’ — निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..

 शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’ — निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..

 ----------------------------------

जयसिंगपूर, प्रतिनिधी

नामदेव भोसले

-----------------------------------

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इचलकरंजी दुय्यम निरीक्षक कार्यालयांतर्गत शिरोळ व कुरुंदवाड विभागातील परवानाधारक बार व परमिट रूमवर दरमहा ‘कलेक्शन’ घेतल्याचा आरोप समोर आला आहे. ही वसुली थेट अधिकाऱ्यांकडून न होता खाजगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते. यामुळे उत्पादन शुल्क निरीक्षकांचा यात नेमका किती सहभाग आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काही बार व परमिट धारकांवर तपास, दंड किंवा कारवाई टाळण्यासाठी ठराविक रक्कम गोळा केली जाते. ही रक्कम संबंधित खाजगी कर्मचारी गोळा करतात व त्यामागे ‘अधिकाऱ्यांची संमती’ असल्याची चर्चा सुरू आहे.


📌 चौकट...


शासन कार्यालयातील महसूल व तपासाशी संबंधित कामात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे.

अशा प्रकारचे ‘कलेक्शन’ प्रतिबंधक भ्रष्टाचार कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो.


चौकट...

स्थानिक व्यापारी संघटना व सामाजिक संघटनांनी या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. “गोपनीय तपासाच्या कामात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप व व्यवसायिकांकडून वसुली, हे लोकशाही व कायद्याच्या तत्त्वांना धक्का देणारे आहे,” अशी प्रतिक्रिया एका व्यापाऱ्याने दिली.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.