घरकुल योजनेकडे आजही वानर समाजाचे डोळे लागून राहिलेत शासनाचा फक्त हवेत बार.अजून किती दिवस पहावी लागणार वाट.

 घरकुल योजनेकडे आजही वानर समाजाचे डोळे लागून राहिलेत शासनाचा फक्त हवेत बार.अजून किती दिवस पहावी लागणार वाट.

------------------------------

बाजार भोगाव प्रतिनिधी

सुदर्शन पाटील 

------------------------------

मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, फुटलेली कौलं, आत पावसाच्या धारांनी भिजलेली जमीन अशी परिस्थिती असणाऱ्या वानरमारी समाजाची अजूनही जगण्यासाठी झुंज सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असली, तरी पन्हाळा तालुक्यातील वानरमारी समाजातील कुटुंबांची स्थिती आजही बिकट आहे. जातीच्या दाखल्यातील चुकीमुळे या कुटुंबांना जमीन, घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. परिणामी या समाजातील अनेक कुटुंबे आजही चंद्रमौळी झोपडीत हलाखीत जीवन जगत आहेत.


    पोंबरे (ता पन्हाळा) येथील डोंगरात वानरमारी समाजातील अकरा कुटुबे राहत असून ४९ लोक राहत आहेत. त्याची घरे म्हणजे मोडकळीस आलेले, जीर्ण फाटक्या छप्पराचा आडोसा असलेले चंद्रमौळी छप्पर होय. उपजीविकेसाठी महिला या रानावनात मिळणारी कंदेमुळे रानभाज्या वापर करतात तर पुरूष हे पावसाळ्यात परिसरातील गावात व उन्हाळ्यात कोकणात जावून पडेल ते काम करतात मुलभूत सुविधांसाठी रोजचा संघर्ष त्याच्या पाचवीला पुजलेला त्यांनी पाहिला. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी दखल घेत पन्हाळा तहसिलदार याना या अकरा कुंटुबाना रेशनकार्ड तसेच पोंबरेतील मतदान यादीत नावे समाविष्ट करुन घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पाच वर्षापूर्वी मतदान यादीत नाव रेशनकार्ड मिळालीत तसेच त्यांना घरकुल व प्रत्येकी पाच गुंठे जमीन देण्यासाठी प्रस्ताव करण्याचा आदेश दिला.


    त्यानुसार वानरमारी कुटुंबाचा जमिन व घर मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणेत आला आहे. अकरा कुंटुंबाना घरे व पचावन्न गुठ्ठे जमिन देण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय परंतु आज अखेर त्यांना ना हक्काची घरे मिळालीत ना जमीन. कारण त्याचे प्रस्ताव सरकारी नियमाच्या लालफितीत अडकले आहेत . 


कोट १

जिल्हाधिकारी यानी लक्ष देण्याची गरज

तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली झालेनंतर वानरमारी यांच्या प्रश्नबाबत प्रशासन स्तरावर म्हणावा तसा वेग आला नाही . त्यामुळे घरकूलाचा प्रश्न भिजत पडलाय . यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याकडे लक्ष देवून वानरमारे कुटुंबाच्या मागण्या पुर्ण कराव्यात अशी अपेक्षा या समाजाकडून व्यक्त केली जात आहे . 


  कोट २

आम्हाला जमीन व घर आज देतो.. उद्या देतो.. असे गेले चार वर्षे झाले साहेब लोकं सांगतात. येथे येतात माहिती घेतात व जातात पण आम्हाला ना घर मंजूर झाले ना जमीन मिळाली आता मोठ्या साहेबांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा 

कृष्णात निकम वानरमारी 


कोट ३

 वानरमारी समाजातील कुटुंबांच्या जात दाखल्यातील चुका दुरुस्त करून त्यांना जमीन व घरकुलाचा प्रस्ताव तयार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे येथे पाठवला आहे. 

नलीनी मोहिते 

मंडल अधिकारी बाजारभोगाव  


फोटोओळ- फाटक्या कपड्याची ठिंगळ लावलेले चंद्रमौळी छप्पराचे घर

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.