Header Ads

कर्नल विक्रम नलवडे यांची कर्मवीर हिरे महाविद्यालयास भेट.

 कर्नल विक्रम नलवडे यांची कर्मवीर हिरे महाविद्यालयास भेट.



---------------------------------- 

गारगोटी : प्रतिनिधी

स्वरूपा खटकर

---------------------------------- 

येथील मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयास एन. सी. सी. चे कमांडिंग ऑफिसर, कर्नल विक्रम नलवडे यांनी आज सदिच्छा भेट दिली. त्यांनी मौनी विद्यापीठातील विविध विभाग,  अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती घेतली. तसेच महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागाला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. एन. सी. सी. कॅडेट्स भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

प्राचार्य डॉ. उदय शिंदे, मौनी विद्यापीठाचे कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, उपप्राचार्य एस. जे. जितकर यांच्या हस्ते कर्नल विक्रम नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. कॅप्टन डॉ. अरविंद चौगले यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाची स्थापनेपासूनची सविस्तर माहिती दिली. यावेळी महाविद्यालयीन शिक्षण व एन. सी. सी. च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.

यावेळी सुभेदार नारायण पाटील, हवालदार खुशबू महाजन, नितीन सरोदे, उप प्राचार्य डॉ. संजय देसाई, मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे, एन. सी. सी विभागप्रमुख प्रा. इंदिरा मोरे, प्रा. एस. बी. केणे, सचिन भांदिगरे, एस. पी. यादव,  शारीरिक शिक्षण संचालक सचिन चौगले आदी उपस्थित होते. 


फोटो : 

गारगोटी : कर्मवीर हिरे महाविद्यालयातर्फे कर्नल विक्रम नलवडे यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. उदय शिंदे शेजारी डॉ. अरविंद चौगले, डॉ. संजय देसाई, डॉ. एस. बी. शिंदे व एन. सी. सी. विभागप्रमुख.

No comments:

Powered by Blogger.