पौर्णिमा-ग्रहणाच्या संयोगात 19 बाहुल्यांचा भानामती उतारा; कुरुंदवाडमध्ये खळबळ.

 पौर्णिमा-ग्रहणाच्या संयोगात 19 बाहुल्यांचा भानामती उतारा; कुरुंदवाडमध्ये खळबळ.

--------------------------------------

कुरुंदवाड प्रतिनिधी

 नामदेव भोसले

--------------------------------------

कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक रहस्यमय घटना उघडकीस आली आहे. शिरढोण रस्त्यालगत नदीकाठावर पौर्णिमा आणि ग्रहणाच्या दुहेरी संयोगाच्या रात्री भानामतीचा संशय व्यक्त करणारा उतारा आढळून आल्याने शहरभरात भीती व चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उताऱ्यात १९ बाहुल्या, त्यापैकी काळ्या दोऱ्याने बांधलेली एक स्वतंत्र बाहुली, तसेच नारळ, तांदूळ, हळद-कुंकू, गुलाल, लाल व हिरव्या रंगाचे ब्लाउज पीस अशी सामग्री सापडली आहे. विशेष म्हणजे कुरुंदवाड नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या २० असताना, केवळ १९ बाहुल्या सापडल्याने नागरिकांत कुजबुज सुरू झाली आहे. "एका नगरसेवकाला वगळून उरलेले सर्व बांधले गेले का?" हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकधारणेनुसार, पौर्णिमा आणि ग्रहणाचा संयोग भानामती किंवा जादूटोण्याच्या कृत्यासाठी विशेष प्रभावी मानला जातो. त्यामुळे ही घटना फक्त अंधश्रद्धा आहे की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला सूचक राजकीय डावपेच, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घटनास्थळी सापडलेली सामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. घटनेमागील उद्देश, तसेच जबाबदार व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. काहींच्या मते हा प्रकार विरोधकांना राजकीयदृष्ट्या ‘बांधून टाकण्याचा’ प्रयत्न असू शकतो, तर काहींच्या मते ही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृती आहे.

निवडणूक जवळ आल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, गेल्या दोन दिवसांपासून कुरुंदवाडमध्ये हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.