चिपरी परिसरात ऑनलाइन कॅसिनोचा गोरखधंदा – नागरिकांचा पोलीस प्रशासनाला सवाल.

 चिपरी परिसरात ऑनलाइन कॅसिनोचा गोरखधंदा – नागरिकांचा पोलीस प्रशासनाला सवाल.

--------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले

--------------------------------

कोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगार, कॅसिनो यांसारख्या अवैध धंद्यांवर कायद्याने बंदी असतानाही जयसिंगपूर शहरातील चिपरी परिसरात ऑनलाइन कॅसिनोचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर ‘रणजीत’ नावाचा इसम हा धंदा चालवत असल्याची चर्चा असून, यामुळे युवक वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन जुगार व कॅसिनो अ‍ॅप्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक व व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलद्वारे सहज उपलब्ध होणाऱ्या या जुगार खेळांमध्ये तरुणवर्ग, तसेच अल्पवयीन मुलेही ओढली जात असल्याची धोक्याची घंटा वाजली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतरही अद्यापपर्यंत पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे बोलले जात असून, प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद असल्याचे वातावरण आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की अवैध धंदे मोकळ्या रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत."रणजीत "हा इसम सर्रास ऑनलाइन कॅसिनो चालवून स्थानिक युवकांना जाळ्यात ओढत आहे.

अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

याबाबत स्थानिक सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तातडीने छापा टाकून धंदा बंद करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असा धंदा उघडपणे सुरू राहणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.