जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 90 हजार मुर्ती संकलन.
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 90 हजार मुर्ती संकलन.
दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत एकूण 290748 मुर्ती संकलन तर सुमारे 492 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत 2931 गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी, कार्तिकेयन एस. यांनी केले होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी, कार्तिकेयन एस. यांनी चंदगड तालुक्यातील शिनोळी व महिपाळगड या गावांना भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. अतिशय दुर्गम भाग असून हि येथील लोकांचा या उपक्रमास उत्स्फूर्त सहभाग मिळत असल्याचे यावेळी दिसून आले.
या उपक्रमासाठी तालुकास्तरावरून सर्व गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्राम पंचायत स्तरावरून सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
उपक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी, कार्तिकेयन एस. तसेच पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.
Comments
Post a Comment