पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत चंदगड तालुक्यातील गावांना कार्तिकेयन एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांची भेट
पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत चंदगड तालुक्यातील गावांना कार्तिकेयन एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांची भेट
पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रम जिल्हा परिषद मार्फत दरवर्षी साजरा केला जातो. उपक्रमाचे हे अकरावे वर्ष असून यावर्षी देखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला आहे. या उपक्रमाचे नियोजन आणि सनियंत्रण जिल्हास्तरावरून केले जाते. यावर्षीचा उपक्रम देखील यशस्वी व्हावा यासाठी ग्रामपंचायत निहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.यांनी चंदगड तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
महिपाळगड हे 265 कुटुंब संख्या असलेल्या या गावांमध्ये सर्व कुटुंबानी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या उपक्रमासाठी गावाने जलकुंड बांधलेले असून या जलकुंडामध्ये गावातील सर्व मूर्ती विसर्जित केल्या जातात. मूर्ती विसर्जनानंतर या कुंडामध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकले जाते जेणेकरून मुर्त्या विघटित होण्यास मदत होते. अशा पद्धतीने दुर्गम भागातील गावांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमांमध्ये पुढचे पाऊल टाकून इतर गावांना आदर्श निर्माण केलेला आहे.
शिनोळी खुर्द या 412 कुटुंब संख्या असणाऱ्या गावांमध्ये देखील गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक पद्धतीने तयार असलेल्या गावातील जलकुंडामध्ये मूर्ती विसर्जन केले जाते. या कुंडातील पाणी इतर कोणत्याही कारणासाठी वापरले जात नाही. गावातील सर्व कुटुंबे या उपक्रमामध्ये सहभागी होतात.
वरील दोन्ही गावांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन उपक्रमाबाबत केलेल्या नियोजनाची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment