गणराया अवॉर्ड २०२५ : संभाजीनगर ABS बाईज गणेश उत्सव मंडळाला प्रथम क्रमांक.

 गणराया अवॉर्ड २०२५ : संभाजीनगर ABS बाईज गणेश उत्सव मंडळाला प्रथम क्रमांक.

---------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले

---------------------------------

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व जयसिंगपूर पोलीस उपविभाग, जयसिंगपूर यांच्या वतीने आयोजित “गणराया अवॉर्ड २०२५” मध्ये शहर विभागातून छं संभाजीनगर लोकशाहिर आण्णा भाऊसाठे ABS बाईज गणेश उत्सव मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा आपल्या नावावर केला.


गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि समाजाभिमुख उपक्रमांसह साजरा करण्यासाठी मंडळाने विशेष योगदान दिले. या योगदानाची दखल घेऊन पोलीस प्रशासन व निवड समितीने मंडळाची निवड केली. या यशाबद्दल पोलीस प्रशासन, निवड समिती तसेच गणेशोत्सवाच्या यशासाठी सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय मान्यवर, व्यापारी, उद्योजक, गणेशभक्त, तरुण मित्र मंडळे, जेष्ठ नागरिक व महिला वर्ग यांचे मंडळाने मनःपूर्वक आभार मानले.


विशेष म्हणजे, कोल्हापूर रोडच्या पलिकडे प्रथमच मिळालेला हा मान मंडळासाठी ऐतिहासिक ठरला. समाजातील मार्गदर्शन आणि आशिर्वादामुळे हा गौरव मिळाल्याचे मंडळाने नमूद केले.


गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा मंडळाचा पुढील प्रवास सुरूच राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.