भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे केंद्र सरकारची ही दुटप्पी भूमिका,असे म्हणत वाठार येथे शिवसेनेचे भव्य निषेध आंदोलन.

 भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे केंद्र सरकारची ही दुटप्पी भूमिका,असे म्हणत वाठार येथे शिवसेनेचे भव्य निषेध आंदोलन.

-------------------------------------------

 अंबप प्रतिनिधी

 किशोर जासूद

-------------------------------------------

पाकिस्तानच्या माध्यमातून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतातील २६ माता भगिनींचे कुंकू पुसले गेले होते. केंद्र सरकारने सिंदूर ऑपरेशनचा दिखावा केला "खून और क्रिकेट एकसाथ खेला नही जायेगा" आशा घोषणा देखील दिल्या. परंतु सद्या सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाच्या दुटप्पीपणा उघड झाला आहे. असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार, जिल्हाप्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

               या आंदोलनावेळी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत वाठार तर्फे वडगाव परिसर दणाणून सोडला.

             यावेळी बोलताना, केंद्र सरकारने घरोघरी सिंदूर पाठवून माता-भगिनींचा अपमान केला होता. याच्या उत्तरार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातुन घराघरातील माता-भगिनींच्याकडून कुंकू गोळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून माता-भगिनींच्या कुंकवाचा अपमान सहन केला जाणार नाही याची आठवण करून देण्यासाठी " माझं कुंकू माझा देश" हा उपक्रम राबवला जाईल असा इशाराच जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी दिला 

यामुळे तालुका प्रमुख श्री बाजीराव पाटील, अनिल दबडे, विभाग प्रमुख उदय शिंदे, निलेश खुर्द, सागर चोपडे, संदीप दबडे योगेश दबडे अमित घोटवडे विजय पाटील, सागर डोंगरे, काका पाटिल, शिवसैनिक, महिला संघटना, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.