रागोळीच्या रेषांतून साकारली आमदार विनय कोरे यांची प्रतिकृती — कलाकार सतिश कुंभार यांचा अद्वितीय आविष्कार.

 रागोळीच्या रेषांतून साकारली आमदार विनय कोरे यांची प्रतिकृती — कलाकार सतिश कुंभार यांचा अद्वितीय आविष्कार.

-----------------------------

कुंभोज प्रतिनिधी 
विनोद शिंगे
-----------------------------
प्रसिद्ध रांगोळी कलाकार सतीश कुंभार यांनी आपल्या सर्जनशीलतेचा अजून एक ठसा उमटवत आमदार विनय कोरे यांची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून बाहुबली येथे साकारली आहे. बाहुबली येथील कल्लाप्पा आण्णा कोल्हापूरे हॉल येथे येथे आमदार अशोकरावजी माने व विनय रावजी कोरे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या यात्री निवासाच्या लोकातून सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या या कलाकृतीने कोल्हापूर जिल्ह्यातील कला क्षेत्रात विशेष लक्ष वेधून घेतले आहे.सतीश कुंभार हे रांगोळी कलेसाठी ओळखले जाणारे नाव असून, त्यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय नेत्यांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिकृती रेखाटल्या आहेत. मात्र, आमदार विनय कोरे यांचं व्यक्तिमत्त्व रंगरेषांमध्ये उतरवणं हे त्यांच्यासाठी एक वेगळंच आव्हान होतं, असं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार विजयरावजी कोरे व आमदार अशोक रावजी माने यांच्या हस्ते सदर रांगोळीतून काढलेल्या प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बाहुबली ट्रस्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील तसेच कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या रांगोळीत विनय कोरे यांच्या नेतृत्वगुणांचं, जनतेशी असलेल्या नात्याचं आणि त्यांचं समाजसेवेसाठी असलेलं योगदान यांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. विविध रंगांचा वापर करत, अत्यंत बारकाईने सादर केलेली ही प्रतिकृती पाहणाऱ्यांना थक्क करते.या कलाकृतीचं अनावरण स्थानिक कला प्रेक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आलं. उपस्थित नागरिकांनी संजय कुंभार यांच्या कौशल्याला भरभरून दाद दिली.

सतीश कुंभार म्हणाले,
"विनय कोरे हे केवळ एक राजकारणी नसून ते समाजासाठी झटणारे नेता आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या विविध पैलूंना रंगांच्या माध्यमातून साकारणं हे माझ्यासाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला."कला प्रेमींना ही रांगोळी प्रत्यक्ष पाहता यावी यासाठी ती काही दिवसांसाठी सर्वसामान्यांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.