सरूड येथे शाहुवाडी तहसीलमार्फत भटके विमुक्त दिनानिमित्त शिबिर संपन्न.

 सरूड येथे शाहुवाडी तहसीलमार्फत भटके विमुक्त दिनानिमित्त शिबिर संपन्न.



 -------------------------------

मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास्ते 

 -------------------------------

    भटक्या विमुक्त जाती जमातीची उन्नती व्हावी यासाठी या समाजातील लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्राच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाने 31 ऑगस्ट ह्या विमुक्त भक्ती जमात दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व समाजाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी जिल्हा, तालुका, प्रत्येक गाव स्तरावरील भटकी विमुक्त जाती-जमातीच्या लोकांच्या पर्यंत पोहोचून या समाजातील लोकांना व मुलांना शैक्षणिक व शासकीय लाभ घेण्यासाठी होणारे शासकीय कागदपत्राच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक विभागाला शासन निर्देश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम आज पासून शाहूवाडी तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, मंडल अधिकारी विकास जाधव तलाठी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरूड. येथील भटके विमुक्त समाजाला लोकांना एकत्र करून या दिनानिमित्त या समाजातील मुलांना शैक्षणिक कामासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड व महसूल निगडित असणाऱ्या प्रश्नाबाबत असणाऱ्या अडचणी दूर करून काही लोकांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देऊन सरूड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करून या समाजातील लोकांची आरोग्याची तपासणी केली व येथून पुढे या समाजात येणाऱ्या शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी महसुली विभाग कायम कार्यरत राहील असे आश्वासन समाजाला दिले 

  या कार्यक्रमासाठी सरूड येथील सरपंच भगवान नांगरे, उपसरपंच सौ वंदना पाडळकर ग्रामपंचायत सदस्य रामदास होवळे, , तलाठी गणेश शिंदे, मनीष तडवळेकर, माही सेवा केंद्रप्रमुख संजय परीट, अरुण थोरात, संदीप केसरी यांच्यासह गावातील ग्रामस्थ व भटके विमुक्त समाजातील सर्व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.