कांटे येथे धक्कादायक घटना पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू.
कांटे येथे धक्कादायक घटना पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू.
-----------------------------
शाहुवाडी प्रतिनीधी
आनंदा तेलवणकर
------------------------------
शाहुवाडी तालुक्यातील कांटे येथील प्रगतशील शेतकरी श्री नाथा (बापू) हरी म्हेतर यांच्या पत्नी सौ. कै . रंजना नाथा (बापू ) म्हेतर वय वर्षे 42 यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान घडली असून तेथे असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले व बेशुद्ध अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या पश्चात दोन मुले पती सासू असा परिवार आहे कायम हसरा चेहरा असणाऱ्या रंजना यांच्या बाबतीत घडलेला हा वाईट प्रसंग सर्वांच्या जिव्हारी लागला त्त्यांच्या या अचानक जाण्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
Comments
Post a Comment