Header Ads

लोंब दावी महिना लावी बाजार भोगाव परिसरात बहरलेल्या भात पिकांनी दिले सुगीचे संकेत.

 लोंब दावी महिना लावी बाजार भोगाव परिसरात बहरलेल्या भात पिकांनी दिले सुगीचे संकेत.

---------------------------------

बाजार भोगाव प्रतिनिधि

  सुदर्शन पाटील

 ---------------------------------

 बाजार भोगाव सह परिसरामध्ये भात पीक चांगलेच बहरले असून काही ठिकाणी भाताच्या लोंबी बाहेर पडल्या आहेत यातूनच  शेतकरी वर्गाला आगामी सुगीची चाहूल लागली आहे  

 सध्याच्या काळात संकरित बियाणांचा वापर होत असून वापरलेले बियाणे किती दिवसात परिपक्व होणार याची माहिती बियाणे खरेदी करतानाच बियाण्यांच्या कंपन्या व  कृषी सेवा केंद्र चालक देत आहेत मात्र पूर्वीच्या काळी संकरित बियाण्यां ऐवजी  घरातीलच टपोरे दाने असलेली बियाणे पेरणी साठी वापरले जायचे त्यामुळे  उगवून आलेले पीक परिपक्व होण्यासाठी किती दिवस लागणार याचा निश्चित अंदाज येत नव्हता मात्र पिकातून बाहेर पडलेल्या लोंबीवरून इथून पुढे पीक परिपक्व होण्यास एक महिना लागणार असा  पक्का अंदाज जुने जाणते शेतकरी लावत असतं म्हणजेच लोंब बाहेर पडल्यानंतर पिक परीपक्व होण्यासाठी अंदाजे एक महिन्याचा कालावधी लागत असून याचाच उल्लेख  लोंब दावी महिना लावी अशा शब्दात केला जातो 

 सध्याच्या काळात वापरल्या जाणाऱ्या संकरित बियाणे खरेदी वेळी पिक परिपक्व होण्यास किती दिवस लागणार याची माहिती मिळत असली तरी भात पिकातून व

लोंब बाहेर पडल्यानंतर पिक परीपक्व होण्यास एक महिन्याचा कालावधी लागत असल्याची माहिती शेतकरी आपल्या अनुभवातून देत आहेत 


 बाजार भोगाव येथे  बहरलेले भात पीक

No comments:

Powered by Blogger.