शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 ------------------------------

जोतीराम कुंभार

------------------------------

         बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या विजयी संघातील खेळाडूंना शाळेच्या वतीने गौरवण्यात आले .


          बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १९ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात उद्धव चौगले याच्या उत्कृष्ठ पासवर व राष्ट्रीय खेळाडू विक्रम रानमाळे , विश्वजित जाधव , रोहन भारमल , मितेश सावंत व विघ्नेश मोरबाळे यांच्या जोरदार स्मॅशच्या जोरावर देवचंद महाविद्यालय अर्जूननगर संघाचा २५ - १२ , २५ - १७ असा लिलया पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात दूधसाखर ज्युनियर कॉलेज बिद्री संघाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला .

            संघातील खेळाडू असे : उद्धव चौगले 

( कप्तान ) , विश्वजित जाधव , विक्रम रानमाळे , 

मितेश सावंत , रोहन भारमल , विघ्नेश मोरबाळे, रोशन भराडे, दिगंबर गोधडे, अथर्व मेटकर ,विराट पाटील , रुद्र बिल्ले, विनीत परीट यांचा समावेश आहे .

            या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक , माजी प्राचार्य महादेव कानकेकर , क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे , प्रशिक्षक संभाजी मांगले , अजित गोधडे , विनोद रणवरे ,सुहास भारमल , अमित साळोखे, श्रावण कळांद्रे, गजानन गोधडे, करण मांगले यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , कार्यवाह आण्णासो थोरवत , प्र.प्राचार्य व्ही बी खंदारे , पर्यवेक्षक पी पी सुर्यवंशी , उपप्राचार्य यांचे प्रोत्साहन लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.