दि.८ सप्टेंबर २०२०छत्रपतीचे नाव,फोटो टाकनाऱ्या बिडी कारखानदारावर गुन्हे नोंदवा..
दि.८ सप्टेंबर २०२०छत्रपतीचे नाव,फोटो टाकनाऱ्या बिडी कारखानदारावर गुन्हे नोंदवा..
-------------------------------------
तानाजी कांबळे
-------------------------------------
दुर्गसंवर्धक,शेतकरी संघर्ष,शेतकरी वाचवाचे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन.
नाशिक:-
छत्रपती शिवराय व युवराज छत्रपती शंभुराजे यांचे फोटो छापून त्यांच्या नावाने कित्येक वर्षे बिडी निर्मिती करणाऱ्या उद्योग मालकांवर गंभीर गुन्हे दाखल करा,तसेच संबंधीत बिडी कारखान्याला टाळे ठोका अश्या आशयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे निवेदन शेतकरी वाचवा अभियान शेतकरी संघर्ष संघटना,शिवकार्य गडकोट संवर्धन समिती ,ग्रामविकास संवाद संस्थेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना (दि.८ सप्टेंबर २०२०) देण्यात आले.
निवेदनात छत्रपती शिवराय व युवराज छत्रपती शंभूराजे यांचा बिडी पैकीगवरील फोटो छापणे व बिडी सारख्या व्यसनी वस्तूला शूर राज्यांची नावे देणे हा शिवशंभू महाराजांच्या भक्तांचा अवमान आहे,समंदीत बिडी उद्योगाचे प्रमुख यांच्यावर राज्य सरकारने विरपुरुषांचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा,व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखवल्याबद्दल हे उत्पादनाच मुळापासून बंद करण्याची कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवधर्म फाउंडेशन व शिवभक्तांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे,यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाना बच्छाव,आम आदमीचे अँड.प्रभाकर वायचळे,ग्रामविकास संवाद मंचचे संयोजक सुरेश भोर (गुरुजी),शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,शेतकरी वाचवा अभियानाचे राहुल बिऱ्हाडे यावेळी उपस्थित होते.
सोबत निवेदन:-
१)छत्रपती शिवशंभुच्या नावे त्यांच्या प्रतिमा छापून बिडी बनवणाऱ्या उद्योगावर गुन्हे नोंदवावे,व हा उद्योग तातडीने बंद करावा यासाठी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे याना निवेदन देतांना नाना बच्छाव,प्रभाकर वायचळे,राम खुर्दळ इ.होते.
Comments
Post a Comment